Surprise Me!

म्हणून मंदिराची पायाभरणी फक्त 32 सेकंदात होणार | Ram Mandir Bhoomipujan | Ayodhya | India News

2021-09-13 94 Dailymotion

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा उद्या पर पडणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबाद पर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे. दरम्यान, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचं पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यापूर्वीच सर्व आमंत्रित पाहुणे आज अयोध्येत पोहोचणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळपासून अयोध्या सील करण्यात येईल. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान, देण्यात आलेल्या प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सुरत्षेच्या कारणास्तव तो कोड तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे., पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #Ayodhya #Rammandir #Bhumipujan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat